रविवार, दि.
१९ नोव्हेंबर २०१७ रोजी, “अनुप जत्राटकर मल्टिमिडीया प्रोडक्शन” अंतर्गत सुरू
करण्यात आलेल्या “प्रियदर्शन पोस्ट-प्रोडक्शन स्टुडियो” चा उद्घाटन सोहळा उत्साहात
संपन्न झाला. या समारोहास निपाणी आणि कोल्हापूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर
उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी संस्थेमार्फत पुरविण्यात येणार्या सुविधा,
तंत्रद्न्यान यांचे दिलखुलास कौतुक केले.
“अनुप
जत्राटकर मल्टिमिडीया प्रोडक्शन” गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने नवनवीन
संकल्पना, प्रोजेक्ट्स राबवत आले आहे. आजतागायत ५० हून अधिक निरनिराळ्या
प्रोजेक्ट्ससाठी प्रोडक्शन चे काम केल्यानंतर पोस्ट-प्रोडक्शनसाठीच्या सुविधा एकाच
छताखाली उपलब्ध व्हाव्यात आणि “स्क्रिप्ट टू स्क्रिन” ही अभिनव योजना राबविता
यावी, या हेतूने गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न सुरू होते आणि अखेर प्रत्यक्ष
कामास ऑगस्ट २०१७ पासून सुरूवात करण्यात आली. दोन महिन्यांच्या अखंड परिश्रमानंतर
हा पोस्ट-प्रोडक्शन स्टुडियो आकारास आला आणि याचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. १९
नोव्हेंबर २०१७ रोजी पार पडला.
राजकिय,
सामाजिक, चित्रपट, नाट्य आणि संगीत क्षेत्रातील व्यक्ती यावेळी आवर्जून उपस्थित
होते. “प्रियदर्शन स्टुडियो” मध्ये कोणत्याही दृक-श्राव्य माध्यमाचे संकलन,
ध्वनिमुद्रण, गीतमुद्रण, पार्श्व-आवाज, संगीत, पार्श्व-संगीत या आणि इतर बर्याच
सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इथे वापरण्यात आलेली यंत्र-सामुग्री
अत्याधुनिक असून त्याचा या क्षेत्रात काम करणार्या कलाकारानां निश्चितच फायदा
होईल.
या
उपक्रमामुळेच जाहिराती, लघुपट, माहितीपट, चित्रपट, वेब-सिरीज यांचे स्क्रिप्ट टू
स्क्रिन कामकाज एकाच ठिकाणी मिळणार असल्यामुळे, कलाकार-तंत्रद्न्यांची सोय झाली
आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.