वाचकहो,
नमस्कार. कसे आहात ? घरी सुरक्षित आहात ना ? घरीच रहा...निदान हे संकट टळेपर्यंत
तरी ! बर्याचदा कथा, पटकथा लिहीताना मी स्वत:ला बंद करून घेतो आणि तोवर घरातून
बाहेर नाही पडत जोवर ते लिखाण पूर्ण नाही होत. लॉकडाऊन घोषित झाल्यावर
वाटलेलं...मी हे लिखाण करेन...ते अर्धवट लिखाण पूर्ण करेन ! पण कसलं काय, साधं मला
पेनवर टाकण्यासाठी साध्या चार ओळीही सुचत नाहीयेत. मग माझं मलाच लक्षात आलं,
लिखाणासाठी जबरदस्तीनं बंद करून “आता लिही...” असं म्हणून लिहीता येत नाही तर, ते
बंधनही स्वत:च घालून घ्यावं लागतं. असो. मुद्दा काय तर या गेल्या ४० दिवसांत मी
काडीचंही लिखाण करू शकलो नाही.
गेल्या आठवड्यात फेसबुकवर पेनवरची “माझी मुंबई” ही कविता टाकली आणि त्या कवितेला खूप छान प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनच्या आधीपासून म्हणजे ३ मार्च पासून माझा मित्र संगीतकार-संकलक रविंद्र चांदेकर आणि माझी विद्यार्थीनी कम कलिग आणि माझी मानसकन्या नम्रता हे दोघे एका प्रोजेक्टसाठी निपाणीला आले होते आणि आजही ते इथेच अडकून आहेत...या दोघांनी भरीला घालून ती कविता रेकॉर्ड करायला लावली आणि रवीने अतिशय छान संकलन आणि संगीत संयोजन करून ती यू-ट्यूबवर टाकायला लावली. मीही उत्साहाच्या भरात टाकली पण ती कविता अशा कांही लोकांपर्यंत पोहोचली की मी त्यांची नावं सांगू शकत नाही ! खूप कौतुक झालं आणि सहज म्हणून टाकलेल्या कवितेने मी खूपच गंभीर झालो. वाचकहो..तुमच्यासाठी त्याची लिंक इथे शेअर करतोय.
https://www.youtube.com/watch?v=tzZEtzcN5Uc
आवडल्यास प्रतिक्रिया
द्या...शेअर करा आणि जमल्यास माझे यू-ट्यूब चॅनल सब्स्क्राईब करा कारण लवकरच पेन
मधल्या लघुकथा, कविता मी रेकॉर्ड करून आता तिथेही टाकणार आहे. तेंव्हा इथे तर भेट
होत राहिलंच शिवाय तिथेही भेटूच ! फेसबुकला तर मी आहेच..आपण तिथेही भेटू शकतोच की
!
वाचकहो...काळजी
घ्या...घरीच रहा ! आणि कविता पाहून प्रतिक्रिया-शेअर-सब्स्क्राईब करायला विसरू नका
!
-अनुप