Pen

PEN 11 : तू दूर गेल्यापासून...

तू दूर गेल्यापासून, रोजच होतात परिचित भास.

कानांशी लगटू लागतात, अखेरच्या भेटीतील शब्दांचे आभास.

दिवसही सरू लागतात, झिंग आल्या गोगलगाईप्रमाणे.

मध्येच सुस्तावतात, लोळतात, शर्यतीतल्या सशाप्रमाणे.

ग्रीष्मात यावी गार झुळूक, तसे भेटतात तुझे श्वास.

तू दूर गेल्यापासून, रोजच होतात परिचित भास.

वळवातल्या सरींनीही आताशी, अबोला धरलाय.

अवचितपणे बरसणार्‍या गारांनीही, निषेध व्यक्त केलाय.

सारेच व्यक्त होवून, तुझ्या स्मृतींची धरतात कास.

तू दूर गेल्यापासून, रोजच होतात परिचित भास.

रस्त्यातून चालताना, बागेतून फिरताना, मी उगाच बोलका होतो.

पापण्यांआडून निसटला तो थेंब पाण्याचा, मग पुन्हा पोरका होतो.

विरह गाणी लेवून ओठी, तो देतो तुझीच आस.

तू दूर गेल्यापासून, रोजच होतात परिचित भास.

स्वप्नांच्या देशांनीही आता, मला हद्दपार केले.

देवून समन्स आता, देशद्रोही जाहीर केले.

हरवून सारे आवळून घेतो, तुझ्या मिठीचे फास.

तू दूर गेल्यापासून, रोजच होतात परिचित भास.

Pen Image

Pen Index