वाचकहो, आज मी तुमच्याशी बोलायचं ठरवलंय. तसं अगदीच कांही खास नाही पण तसं
औचित्त्य मात्र नक्कीच आहे. १ फेब्रुवारी २०१७ ला मी ही वेब-साईट लॉंच केली खरी
मात्र त्यानंतरचे २-३ महिने ही वेब-साईट इम्प्रूव्ह करण्यात गेले. म्हणजे,
सुरूवातीला खूपच वाईट होती वगैरे नाही पण माझा मित्र आणि “अविट” चे सर्वेसर्वा
श्री. अभिजीत जगदाळे, हा अवलिया व्यक्ती स्वत:च्या कामावर समाधानीच होत नव्हता. आठवड्यातून
किमान दोन वेळेला फोन करून म्हणायचा, “अनुपराव...आणि २ दिवस द्या...आपण अजून वेगळं
कांहीतरी करू...कळलं का ?” त्याच्या या उत्साहाचं मलाच राहून राहून आश्चर्य वाटत
आलंय. तर मुद्दा हा की, अभिजीतच्या याच वेगळेपणाच्या वेडापायी म्हणा किंवा माझ्यावरच्या
प्रेमापोटी म्हणा पण आज आम्ही “सबस्क्राईब” ऑप्शन सुरू केला आहे. ज्यांनी-ज्यांनी
गेल्या २ दिवसात पेज-व्हिजीट दिली असेल त्या सर्वांना ते लक्षात आलेच असेल. आता
तुम्ही म्हणाल, याची काय गरज होती ? गरज होती. का ? ते थोडं विस्तारानं बोलतो.
साधारण वर्षभरापूर्वी माझा सहकारी मित्र आणि संगीतकार रविंद्र सुतार याने एका
मिटींगच्या निमीत्ताने पहिल्यांदा वेब-साईटची कल्पना मांडली. सर्वांना आवडली पण
सर्वात जास्त मीच विरोध केला. कारण बर्याच जणांनी वेब-साईट सुरू करून ती कांही
महिन्यातच बंद केली. त्याचं कारण सोप्पं होतं. एकदा लोकांनी तुमची माहिती वाचली की
संपलं ! मग ती साईट फक्त क्लाएंटला दाखवण्य़ापुरतीच मर्यादित रहाते (इथं मी फक्त पर्सनल
साईट्सबद्दल बोलतोय, कॉर्पोरेट किंवा तत्सम साईट्सबद्दल नव्हे, याची कृपया नोंद
घ्यावी.), त्यामुळे माझा विरोध होता पण नंतरच्या काळात झालेल्या चर्चेतून आपण जर
दरवेळी, कांही ठराविक दिवसांनी सोशल मिडीयावर अपडेट्स देतो तसं कांही वेगळं दिलं
तर ? या विचारातून वेब-डिझाईनला सुरूवात झाली. सलग ४ महिन्यांच्या कामानंतर अभिजीतला
पसंत पडलेलं डिझाईन मला दाखवलं आणि तेच फायनल केलं. त्यासाठी रविंद्र सुतार, अभय उलस्वार,
एस.के. यांनी फोटोग्राफी केली. ४ जणांची “अविट” टिम यासाठी राबत होती. आणि
त्यांच्या कल्पनेतून जन्म झाला, “पेन” या ऑप्शनचा !
सुरूवातीला “ब्लॉग” किंवा “रायटिंग्ज” असं कांही ठेवायचं ठरवलं गेलं पण
मराठीतील “लेखणी”वरून सर्वानुमते “पेन” हे नाव फायनल झालं, जिथं मी कोणतंही लिखाण
करू शकत होतो जे माझ्या लेखणीतून उतरलेलं असेल ! मी “पेन”साठी खर्या अर्थाने
जूनच्या पहिल्या आठवड्यात लिहायला सुरूवात केली आणि बघता-बघता कोणतीही प्रसिध्दी न
करता वेब-साईट चं ट्रॅफीक वाढू लागलं. यासाठी आपणा सर्व वाचकांचे खूप खूप आभार !
आपल्यापैकी कांही जणांनी फोन, मेसेजिस, मेल करून खूप सुंदर प्रतिक्रीया दिल्या,
कांही मौलिक सूचना केल्या. यासार्याबद्दल मी आपला ऋणी आहे. यातूनच “सबस्क्राईब”
ची कल्पना आकाराला आली. गेल्या दोन आठवड्यांपासून अभिजीत आणि त्याची टिम यावरच काम
करत होती. आपण जर वेब-साईटला सबस्क्राईब झालात तर जेंव्हा-जेंव्हा नविन अपडेट
येईल, नविन पेन, न्यूज अपलोड केल्या जातील किंवा कोणतीही माहिती टाकली जाईल
तेंव्हा त्या संदर्भातील नोटिफिकेशनचा मेल, मेसेज तुम्हांला मिळेल. आपण भरलेली
माहिती डिरेक्ट सॉफ्टवेअरला जात असल्याने त्यातून तुम्हाला ऑटोजनरेटेड मेसेजेस
येतील आणि आपली माहिती, फोन नंबर यांचा दुरूपयोग होणार नाही, तसेच आपण भरलेली
माहिती अत्यंत गोपनिय राखली जाईल याची मी आपणांस हमी देतो.
सबस्क्राईब करण्यामागचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे, नाविन्य राखणे. दरवेळी
कांही ना कांही बदल करून साईटमधे ताजेपणा आणण्यासाठी मी आणि माझी टिम सदैव कार्यरत
राहूच ! वाचकहो...पेन या सदरात दरवेळी नाविन्य आणण्याचाही मी प्रयत्न करत राहिन पण
त्यासाठी आपल्या प्रतिक्रिया आणि सबस्क्रिप्शन होणे अनिवार्य नाही पण गरजेचे आहे.
कारण ते आंम्हाला कार्यरत रहाण्यासाठी प्रोत्साहन देत राहिल.
आपले विनित,
एन अनुप
जत्राटकर मल्टिमिडीया प्रॉडक्शन आणि अविट सोल्यूशन्स