प्रिय
वाचकहो,
सध्या एका मराठी चित्रपटाच्या पटकथेचे
काम सुरू असल्याने पुढचे कांही दिवस माझ्याऐवजी इतर कांही लेखकांचे लेख, कथा,
कविता वाचायला मिळतील. आपलेही कांही लिखाण असेल तर आपण मला पाठवू शकता. उचित
साहित्याला नक्कीच प्रसिध्दी दिली जाईल. आज दि. १४ जानेवारी २०१८ पासून, माझे
वडिलबंधू आणि गुरू, श्री. आलोक जत्राटकर (जनसंपर्क व माहिती अधिकारी, शिवाजी
विद्यापीठ, कोल्हापूर) यांची १९९५-९६ सालची पुरस्कार प्राप्त दीर्घकथा प्रकाशित
करत आहोत. आम्हांला विश्वास आहे, आपणांस ती नक्कीच आवडेल. आपल्या अभिप्रायाच्या
प्रतिक्षेत.
आपला,
-अनुप जत्राटकर
इतर १ : दीर्घकथा १ : दोष कुणाचा ?
लेखक-आलोक जत्राटकर
प्रकरण एक
पूर्वी नोकरी करीत
असताना जे
काही थोडेफार
पैसे साठवले
होते, ते नोकरी
शोधण्याच्या कामी
मला उपयोगी
पडणार होते.
मी आधीच
ठरवलं होतं
की, आपल्या
गावांत कितीही
चांगली नोकरी
मिळाली तरी
करायची नाही.
जरा आपल्या
कक्षेतून दूर
सरकून बाहेरच्या
जगाचाही अनुभव
घ्यायला हवा, असा विचार मनाशी
पक्का करुन
मी पुण्याचा
रस्ता पकडला
आणि तिथेच
माझ्या आयुष्याला
कलाटणी मिळाली.
मी बेल वाजवली.
थोडयाच वेळात
दार उघडले
गेले. आतला
मनुष्य समोर
आला. मी पाहातच राहिलो.
हा एखादा
मध्यमवयीन मनुष्य
(की म्हातारा?)
असेल, असा जो
माझा अंदाज
होता, तो साफ
चुकला.
समोर ऐन पंचविशीतला तरुण होता. वर्ण निमगोरा, चेहरा
आकर्षक आणि
हसमुख
होता. चेहऱ्यावर
उगवलेल्या दाढीमुळे
चंद्राला ग्रहण
लागावे, तसा काहीसा
तो दिसत
होता.
बाकी शरीरयष्टी
तशी किरकोळच
होती.
'माझ्याकडे काही काम
आहे का?’-तो
या त्यांच्या गोड
आणि आपुलकीच्या
आवाजाने मी
भानावर आलो. मग मी त्याला
माझा परिचय
दिला.
'मी लक्ष्मण
सुर्यवंशी नुक्तीच
एका फॅक्टरीत
सुपरवायझरची नोकरी
मिळाली.
पण रहायच्या
जागेचा प्रॉब्लेम
!
जर तुमची
हरकत नसेल
तर मी
तुमच्यासोबत राहिलो
तरी चालेल
असे घर
मालकांनी सांगितले
आहे.
तुमच्या संमतीसाठी
मी आलो
आहे.
मालकांचे पत्रही
आहे.'- मी
असे म्हणत त्याला
पत्र दाखवले
तो पत्र
घेवून वाचू
लागला.
'प्लिज नाही म्हणू
नका !' -मी कळकळीच्या
स्वरात म्हणालो.
आता तु काय
म्हणतो इकडे
माझे लक्ष
लागून राहिले
होते.
'माफ करा हं!...'-तो
त्यांच्या तोंडचे
उद्गार ऐकून
मी पुरता
निराश होवून
परत फिरु
लागलो.
पाठीमागून त्यांच्या
खळखळून हसण्याचा
आवाज आला. आधीच माझा राग
आनावर झाला
होता.
घुश्श्यातच मोठयाने
म्हणालो, 'दुसऱ्याच्या
असहाय्यतेवर हसण्याला
पुरुषार्थ म्हणत
नसतात.'
यावर पुन्हा मोठयाने
हसत तो
म्हणाला,
'अहो,
परत फिरा. मी 'माफ करा'
असं म्हटलं
ते तुम्हाला
जाण्याबद्दल नव्हे
तर घरात
न बोलावल्याबद्दल म्हटलं होतं. पण अर्धवट ऐकून
चिडलात.
या, आत
तरी या.'
मला अतिशय शरमल्यासारखं
झालं.
मग दोघांनी
मिळून चहा
घेतला.
त्यांच्यासोबत राहायचे
ठरले.
त्यानेसुध्दा आपण
एकटे फार
बोअर होत
असल्याचे सांगितले. मग आम्ळी दोघांनी
एक मजेशीर
करार केला. दोघांनी निम्मेनिम्मे भाडे
देण्याचे ठरले. एक दिवस त्याने
व एक दिवस मी
असा स्वयंपाक
करण्याचे ठरले
कारण दररोज
बाहेरचे जेवण
परवडण्यासारखे नव्हते. रविारी मात्र दोघेही
सुट्टीवर असल्याने
त्या दिवशी
बाहेर जेवायचे
ठरले.
हा रविवारचा
खर्चही अल्टरनेटली
करायचे ठरले. अशा तऱ्हेने करारावर
शिक्कामोर्तब झाल्यानंतर
मगच दुसऱ्या
दिवशी मी
लॉजवरचे माझे
सामान घेऊन
त्यांच्याकडे आलो.
आता त्याचा माझा इतका परिचय झाल की समवयस्क असे आम्ही एकमेकांना 'महया' आणि 'लक्ष्या' म्हणूनच बोलावत होतो. मी त्याला माझी एकूण परिस्थिती तसेच घरचे वातावरण या संबंधी माहिती सांगितली. त्यावर तो आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पहातच राहिला. गप्पातून त्याच्याबद्दल मला असे समजले की, त्याचे वडिल कोल्हापूरला असतात. आई मात्र त्याला जन्म देत असतानाच बाळंतपणात वारली होती. तोसुध्दा एकुलता एकच होता. सरकारी कामावर नेमणूक झाल्याने हा इथे आला होता. इथेच सेटल होण्याचा त्याचा विचार होता. लग्नाच्या बाबतीत मात्र तो नेहमीच उदासीन असे. कदाचित, ब्रह्मचारीच राहण्याची त्याची इच्छा होती. 'खरंच तसं होतं की काय? मला माहित नव्हतं. कारण बहुतेकजण लग्न ठरेपर्यंतच आपल्या ब्रम्हचर्याचं कौतुक जगाला सांगत असतात.' असो. आणखी एक असं की, त्याची एक मानलेली बहिण होती. लग्नानंतरसुध्दा ती नवऱ्यासोबत वडीलांकडे राहत होती. कारण एक तर वडिलांची देखभाल ठेवणारं जवळचं असं कोणी नव्हतं. आणि दुसरं म्हणजे तिचे मिस्टर तिथल्याच स्टेट बैंकेत मॅनेजर होते. तिच्यावर महेशचे अतिशय प्रेम होते. तिचा एकही शब्द तो खाली पडू देत नसे, कारण आईमाघारी तिनेच त्याला सांभाळून मोठे केले होते. पण गेल्या तीन चार वर्षात तो तिला भेटलासुध्दा नव्हता. तिने लग्नाचा विषय काढला तर?
एकदा
मी कामावरुन
घरी आलो
तर बाहेरुन
खिडकीतून, महेश
एका सुंदर
तरुणीशी बोलत
बसल्याचे दिसले. महेश,
आणि मुलगी? हे समीकरण काही
माझ्या ध्यानात
येईना पण
जिज्ञासा मला
शांत बसू
देईना.
मी दाराशीच
लपून उभा
राहिलो व
त्यांचं बोलणं
ऐकू लागलो. खरं तर ही
एक बेकार
सवय होती
पण हे
काय गौडबंगाल
आहे ते
मला समजून
घ्यायचं होतं.
महेश म्हणत होता,
'अगं
अशी अचानक
भेटशील असं
मला स्वप्नातही
वाटलं नव्हतं.'
'मलाही
नाही.
पण काय
रे, मी
इथे शिकतेय
हेही तुला
माहित नव्हतं
का? मी
तुझ्या घरी
किती तरी
पत्र पाठविली
होती.
पण एकाचंही
उत्तर देशील
तर शपथ?’- ती
'अगं
पण मी
मिरजेमध्ये होतो. तेव्हापासून मी फारच
थोडया वेळा
घरी गोलो
होतो.
त्यात तुझा
पत्ताही ठाऊक
नव्हता?'
'आता
तर आपली
भेट झाली
ना ! आता आपण दूर
नाही व्हायचं.'
'म्हणजे?'-महयाच्या तोंडून
आश्चर्यवाचक प्रश्न.
'महेश,
तू काही
म्हणेनास का
मला? पण
आज जे
माझ्या मनात
आहे ते
मी तुला
सांगणार आहे. महेश,
आय लव्ह
यू ! आणि मला
केवळ तुझ्याशीच
लग्न करायचंय.
मी माझ्या
आईलाही सर्व
सांगितलंय.
आता फक्त
तू हो
म्हण.'
तिचे हे उद्गार
ऐकून महेश
चाट् पडला
असेल पण
मला मात्र
धक्का बसला. प्रथमच आयुष्यात इतकी
धाडसी मुलगी
पहात होतो. आता हे ब्रम्हचारी
काय बोलतात
इकडे मी
कान देऊन
ऐकू लागलो.
महेश बोल लागला,
'प्रीती,
तू मनात
काहीही न
ठेवता मला
बोललीस.
मला त्याचा
राग नाही
आला.
पण एक
सांगतो प्रीती. माझ्या आयुष्यात असे
काही प्रसंग
घडले आहेत,
की मी
सर्व भावभावनांपलिकडे गेलो आहे.
त्यामुळे तू
प्लीज माझ्यासाठी
थांबू नको. लग्न करुन तू
तुझा संसार
आनंदाने थाट. माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी
आहेतच.
आपले संबंध
हे चांगले
मैत्रीचेच रहावेत,
अशी माझी
इच्छा आहे. तेव्हा तू विचार
कर !'
'..... मी नीट
विचार केलाय. तुझ्याशिवाय मी इतर
कुणाबरोबरही सुखी
राहू शकणार
नाही.
मी तुझी
वाट पाहीन
!...'
प्रीती बोलत असतानाच
मी दारात
गेलो. मला पाहून
ती एकदम
बोलायची थांबली. महेशने तिच्याशी माझा परिचय
करुन दिला.
‘मी सध्या माझ्या
पार्टनरबद्दल सांगितले
ना, तो
हाच तो
लक्ष्मण ! आणि लक्ष्या
ही प्रीती
देशमुख!
कोल्हापूरमध्ये आमच्या
अपार्टमेंटमध्ये रहात
होती.
आता आईबरोबर
इथे पुण्यात
राहते.’
महेश असा काही
बोलत होता
की इथे
यापूर्वी घडलेला
प्रकार मला
माहितच नव्हता. मी ही मग
तसे न
जाणवू देता
तिला 'नमस्कार'
म्हटले आणि
आत निघून
आलो.
तीसुध्दा मग
लगेच 'बाय' म्हणून
महेशचा निरोप
घेऊन निघून
गेली.
जाताना मात्र
मला उगीचच
तिच्या डोळयात
अश्रू तरळयाचा
भास झाला.
महेशचे अंतरंग जाणून
घेण्याच्या हेतून
मुदाम त्याला
डिवचून म्हणालो,
'काय
ब्रम्हचारी महाशय,
लग्नाचा विचार
तर नाही
ना?'
यावर तो नेहमीप्रमाणे
खळखळून हसेल
असे वाटून
त्याच्याकडे पाहिले
तर त्याच्या
चेहऱ्यावरचे भाव
पटापट बदलले. नेहमीच्या हास्याची जागा
कधीही न
दिसणाऱ्या रागाने
घेतली होती. डोळयात किंचित दु:खाची
झलक होती. तो मोठयाने म्हणाला,
'लक्ष्या,
पुन्हा लग्नाचा
विषय काढून
छेडलेस तर
तुझी खैर
नाही.
ती फक्त
माझी मैत्रीण
होती.
भेटली म्हणून
घरी आणले. बस्स! यापलीकडे तिचा माझा
काही संबंध
नाही.'
एवढे बोलून तो
पटकन् फिरुन
बाहेर गेला. मला मात्र कसेसेच
वाटले.
सगळं माहित
असूनही कुळून
त्याला चिडवायची
दुर्बुध्दी झाली
असं मला
वाटू लागलं
होतं.
मनात खळखळ
माजली. आपण भलतच
बोलून गेलो हे कळत होतं पण आता इलाज नव्हता ! कळत न कळत का असेना माझ्याकडून
त्याच्या पूर्व-आयुष्यातली एखादी दुखरी जखम डिवचली गेली होती, हेच खरं होतं !
‘काय
झालं असेल बरं...?’
(क्रमश:)
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.