बराच
वेळ कोणीच
काहीही बोललं
नाही.
ताई कॉटच्या
सळीला डोकं
टेकून बसल्या
होत्या.
मला काही
बोलायला सुचेना,
गेले वर्षभर
आपण ज्या
माणसासोबत रहात
आहोत, त्याने
आपल्या दु:खाची
ही बाजू
कधी प्रकाशातच
आणली नाही. मी मात्र त्याला
बऱ्याचदा दोष
देत होतो. दुसऱ्याला नेहमी आनंदात
ठेवायचे एवढेच
त्याला माहित
होते.
सतत हसमुख
असणाऱ्या या
चेहऱ्याभोवती इतकी
चिंतावलये असतील,
याची मला
कल्पनाही आली
नव्हती किंवा
त्याने येवू
दिली नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर आता
मला वेगळेच
तेज भासू
लागले.
आगीतून तावून
सुलाखून निघालेल्या
तलवारीच्या पात्याप्रमाणे
!
थोडयात
वेळात ताई
सावध होऊन
बोलू लागल्या,
'मयू, तू
सोसलंस ते
सर्व खरोखरच
अतिशय वाईट
आहे.
जो सोसतो
त्यालाच त्या
वेदना कळतात. मला एकाच गोष्टीचा
अभिमान वाटतो
की इतका
सर्व अपमान
सोसूनही कुणाचेही
वाईट करण्याचा
विचारही तुझ्या
मनात आला
नाही.
आज माझ्या
संस्कारांचे सार्थक
झाल्याचा मला
आनंद वाटतो. वरं,
तू मला
दिव्याचा पत्ता
दे.
मी तिला
तुझ्यासाठी राजी
करते.
अरे, केवळ
राखी बांधून
कोणी कुणाची
बहिण होत
नसते.
त्याकरीता अंत:करणातून
उमाळा यावा
लागतो.
तू तिच्या
आयुष्यातून बाजूला
झालास.
हा तुझा
मोठेपणा आहे
पण हीच
गोष्ट तिला
'नीच' दाखवण्यास
कारणीभूत ठरते.'
'म्हणूनच
ताई.
तू तिच्याशी
कोणतीच बोलणी
करु नकोस. लायकी नसतानाही तिने
तुझ्याशी बरोबरी
करण्याचा प्रयत्न
केलायं याचा
तिला पश्चाताप
करावा लागेल.'
'पण
तेव्हा फार
उशीर झालेला
असेल, मयू.'
'ताई,
आयुष्यात कोणतीच
गोष्ट वेळेवर
घडत नाही. केवळ भाग्यवंतांच्या बाबतीतच
असं घडू
शकतं.
दुर्दैवाच्या खाईत
लोटल्या गेलेल्या
अभाग्यांना ते
साधत नाही,
हेच खरं.'
संध्याकाळ
झाल्याचंही कोणाच्या
ध्यानी नाही
आलं अखेर
मीच चहा
करण्यासाठी म्ळणून
स्वयंपाकखोलीत आलो. चहा करताना अभावितपणे
माझा हात
डोळयांच्या ओल्या
नेत्रकडा पुसण्याकडे
गेला.
चहा झाल्यावर
ताई जाण्यास
निघाल्या, जाताना
इतकंच बोलल्या,
'मयू, मी
माझ्या परीने
तुला सांगितलं. निर्णय काय तो
तूच घ्यायचास. मी पप्पांची समजूत
घालीन.'
दरम्यानच्या
काळात महेशला
मोठमोठी सरकारी
टेंडर्स मिळत
गेली.
त्यात त्यांचा
बराच फायदा
झाला.
अखेर त्याने
सरकारी नोकरीचा
राजीनाम देऊन
स्वत:ची 'अनुराधा कन्स्ट्रक्शन
कंपनी' उभी
केली.
त्याच्या पूर्वीच्या
कामगिरीमुळे तो
पुढेही सतत
बिझी राहू
लागला.
मलाही त्याने
कारखान्यातली नोकरी
सोडायला लावून
त्याच्याच कंपनीत
मॅनेजरची नोकरी
दिली.
कंपनीच्या पहिल्या
वर्षीच प्रॉफीटमधून
त्याने एक
टुमदार बंगला
पुण्यातच बांधला. मग तो आणि
मी त्या
नव्या बंगल्यात
ट्रान्स्फर झालो. तसेच,
कोल्हापूरहून त्याने
आपल्या आजारी
पप्पांनाही इलाजासाठी
आणवले.
ताई आणि
भावोजी मात्र
कोल्हापूरातच राहिले.
कंपनीचा
व्याप सांभाळताना
वडिलांकडे अजिबात
दुर्लक्ष होता
कामा नये,
असे महेशचे
प्रामाणिक मत
होते.
त्यासाठी त्याने
ससून हॉस्पिटलमधील
त्याच्या एका
डॉक्टर मित्राला
एखाद्या नर्सची
नेमणूक करण्यास
सांगितले.
दुसऱ्या
दिवशी पहाटे
तो कंपनीच्या
कामानिमित्त मुंबईला
गेला.
मग सकाळी
मी पोर्चमध्ये
वर्तमानपत्र वाचत
बसलो होतो. पप्पा अजून उठले
नसल्याने चहा
वगैरे काहीच
झालेलं नव्हतं. इतक्यात दारासमोर लुना
थांबल्याचा आवाज
आला.
सकाळी सकाळी
कोण आलं
म्हणून मी
पाहू लागलो
तर एक
नर्स दारात
उभी होती. तिला पाहिल्यावर मला
आश्चर्याचा सुखद
धक्का बसला
कारण ती
नर्स दुसरी
तिसरी कोणी
नसून प्रीतीच
होती.
'अरे,
तुम्ही इकडे
कशा आलात?'
माझा प्रश्न.
'अहो, मी
नर्सिंगचा कोर्स
कंप्लीट केलाय
आणि ससून
हॉस्पिटल जॉईन
केले.
काल डॉक्टर
देशपांडयांनी मला
इथे या
पत्त्यावर यायला
सांगितलं होतं. म्हणजे तुमच्या वडिलांना
बरं नाही
तर?
काय झालंय
त्यांना?'
'आत या. जरावेळ एका ठिकाणी
शांत बसा. तुमच्या सर्व प्रश्नांची
मी उत्तरे
देईल.'
यावर गोड
हास्य करुन
ती आत
आली, आणि
सोफ्यावर बसली. जवळच खुर्चीत मी
बसलो.
'हां, आता
माझ्या प्रश्नांची
तुम्हाला उत्तरं
देण्यास काहीच
हरकत नसावी.' प्रीतीचा मिस्कील प्रश्न.
मग मीही
सांगायला सुरुवात
केली.
'एकतर हे
घर माझं
नाही.
हे घर
महेशचं आहे
आणि त्याच्या
वडिलांना नेहमी
दम्याचा त्रास
होत असतो. आम्ही दोघे अजूनही
एकत्रच राहतो.'
'मग, महेश
कुठय?' 'अहो,
तो कंपनीच्या
कामानिमित्त मुंबईला
गेलाय.
रात्रीपर्यंत येईलच. बरं,
महेशचे वडिलही
तुमच्या ओळखीचे
असतीलच.
त्यामुळे तुम्ही
त्यांची व्यवस्थित
काळजी घ्याल. याची मला खात्री
आहे.'
प्रीती मात्र
काहीशी नाराज
होऊन बोलली,
पण माझं
इथं येणं
महेशला आवडेल?'
'का नाही?
जर माझीच
काही हरकत
नसेल तर
तो काय
करणार आहे
मला.'
असे म्हणत
महेशचे वडीलच
बाहेर आले. प्रीतीने त्यांच्याकडे बघून
स्मित केले
आणि म्हणून
उठून त्यांना
आधार द्यायला
लागली.
'अहे नर्सवाई,
आलयाआल्या लगेच
डयुटीचा चार्ज
नको घ्यायला
काही.
जरावेळ, बसा. अरे,
लक्ष्मण आपल्या
सर्वांनाच चहा
ठेव बरं.'
'पप्पा, मी
करते की. त्यांना कशाला उगीच
त्रास.
मला किचन
दाखवा, एवढयात
करुन आणते.' मी उठलेला परत
बसलो पण
पप्पा म्हणाले,
'अगं प्रीती. उद्यापासुन तुझ्याच हातचा
चहा पिणार
आहे.
चहाच काय
स्वयंपाकही तुच
करायला हवास. या दोघांच्या हातचं
खाऊन कंटाळलोय
झालं.
पण तू
या लक्ष्याच्या
हातचा चहा
पिऊनच बघ
एकदा.
असाल मस्त
करतो की
बस्स।'
पप्पांच्या स्तुतीने
मी उठून
लगेच कीचनमध्ये
चहा करण्यासाठी
शिरलो.
पप्पा आवरण्यासाठी
म्हणून गेले. आणि प्रीती माझ्या
मागोमागच किचनमध्ये
आली आणि
डायनिंग टेबलच्या
खुर्चीत बसली. मला काहीतरी ती
विचारणार असावी
असे वाटले. पण बहुतेक सुरुवात
कोठून करावी
तेच तिला
समजत नव्हते. अखेर मनाचा धीर
करुन तिनं
विचारलं, 'महेश
कधी माझ्याबद्दल
बोलतो?'
मला क्षणभर
काय उत्तर
द्यावे हेच
कळेना.
मग तिला
म्हणालो, 'अधूनमधून
निघतो तुमचा
विषय.
ताई रक्षाबंधनाला
आल्या होतया
तेव्हा तर
तुम्ही त्यांना
भावजय म्हणून
पसंत असल्याचंही
त्या बोलल्या. पण महेशही तुम्ही
त्याची एक
जीवलग मैत्रीण
असल्याचं मान्य
करतो.
पण लग्नाच्या
बाबतीत तो
एकूणच उदास
आहे.'
मग मात्र
मी प्रीतीला
मला माहित
असलेली सर्व
कथा थोडक्यात
एेकवली.
तिच्यादेखील डोळयातून
टपकन् अश्रंूचे
दोन मोती
गालावरुन खाली
ओंघळले.
मी तिच्याकडे
अतिशय करुणा
भावनेने पहात
होतो.
इतक्यात पप्पा
कीचनमध्ये पोचले
आणि लक्ष्या
रागाने म्हणाले,
अरे तुम्ही
दोघे एकमेकांकडे
असेच पहाच
राहणार आहात
की या
म्हाताऱ्याला चहा
देणार आहात. बिचारा चहा सुध्दा
कंटाळून उतू
जाऊ लागलाय.' आणि प्रीतीकडे वळत
ते म्हणाले,
'बरं कायगं
सूनबाई, तू
या लक्ष्याबरोबर
जर बोलत
बसलीस ना
तर तुझं
कोणतंही काम
हा धडपणे
होऊ देणार
नाही.
बोलघेवडा आहे
नुसता.'
पप्पांच्या तोंडून
'सूनबाई' ही
हाक एेकून
प्रीतीने प्रफुल्लीत
होऊन झटकन्
त्यांचे पाय
धरले.
तिला हंुदका
आवरेना.
पप्पांनी मग
तिच्या दंडाला
धरुन उभे
केले आणि
तिला म्हणाले,
'जरी अजून
झाली नसलीस
ना तरी
माझ्या मनाने
तुला सून
म्हणून केव्हाच
स्वीकारलंय.
तेव्हा शांत
हो, स्वत:ला
सावर.' हुंदका
आवरुन प्रीती
फक्त इतकंच
बोलली, 'आज
मला माझ्या
आयुष्याचं सार्थक
झाल्यासारखं वाटतंय.'
नंतर आम्ही
सर्वांनी मिळून
चहा घेतला. प्रीती जेवणाची तयारी
करु लागली. मी तिला हाताखाली
मदत करत
होतो.
पप्पा मात्र
बाहेर बागेत
फेरफटका मारत
होते.
थोडया वेळाने
ते आत
आले.
आत आल्यावर
त्यांनी प्रीतीला
विचारलं, 'अगं
सूनबाई, मघा
मी तुला
विचारलं नाही
पण तुझी
आई कशी
आहे?
तिची तब्येत
वगैरे तर
ठीक आहे
ना?' प्रीतीच्या
चेहऱ्यावर उद्विग्नता
पसरली.
तिने मोठया
संयमाने सांगितलं,
'पप्पा, आई
दीड वर्षांपूर्वीच
वारली.
तिीच सेवा
मला व्यवस्थित
करता आली
नाही म्हणून
नंतर मी
नर्सिंगचा कोर्स
करुन आता
हॉस्पिटलमधल्या इतर
रोग्यांची सेवा
करण्यातच समाधान
मानते आहे.'
'पण मग
तुझी आई
अशी अचानक
कशी वारली?
आणि तू
आता राहतेस
कोठे?' पप्पांनी
आपुलकीने विचारले.
'तीन वर्षांपूर्वीच
आईला हदयविकाराचा
पहिला झटका
आला होता. मी तिला कोणताही
ताण पडू
देत नव्हते. तरीही तिला हदयविकाराचा
दुसरा झटका
आला.
उपचारांची संधीही
न देता ती मला
सोडून गेली. त्यानंतर मी लेडीज
हॉस्टेल मध्ये
एक ब्लॉक
घेतला आणि
तिथेच राहत्येय. या जगात मला
आपलं असं
एकही माणूस
राहिले नाही.' स्वत:वर प्रचंड नियंत्रण
ठेवून प्रीती
बोलत होती. तिचा निर्धार पाहून
पप्पांनाच भरुन
आले.
'कोणी नाही
असं का
म्हणतेस बेटा?' तुझा पप्पा असताना
तुला कसली
काळजी?
मी. तर
म्हणतो, तू
इथं माझ्याजवळच
रहायला यायला
हवीस, नव्हे
आलेच पाहिजेस.'
'पण, मला
इथं आलेलं
पाहून महेशला
काय वाटेल?'
'हे बघ
बेटा, ते
सर्व माझ्यावर
सोपव.
शेवटी तुला
माझी सेवा
करण्यासाठी दवाखान्यानंच
पाठवलं आहे. तेव्हा तो तुला
काही म्हणणार
नाही आणि
हा लक्ष्या
केव्हा उपयोगी
पडणार आहे. हा घालेल त्याची
समजूत ! काय रे घालशील
ना? मी 'होय' म्हणालो. पण हे एक
मोठं दिव्यच
होतं हेही
तितकंच खरं
!
मी नंतर
काही न
बोलता गप्प
राहिलो.
राहून-राहून मी
मनातल्या मनात
प्रीती आणि
कल्पनेतली दिव्या
यांच्यात नकळतपणे
तुलना करुन
पाहिली.
प्रीती दिव्यापेक्षा
कैक पटींनी
सरस ठरत
होती.
प्रीतीने केलेला
स्वयंपाकही अतिशय
रुचकर झाला
होता.
मला तार्इंची
तीव्रतेने आठवण
झाली.
मी भरपेट
जेवून मगच
ऑफिसकडे रवाना
झालो.
रात्री घरी
परत आलो
तेव्हा प्रीती
संध्याकाळचा स्वयंपाक
करुन, पप्पांना
जेवायला घालून. त्यांना गोळया देऊन
निघून गेली
होती.
पप्पांनी दरवाजा
उघडला.
अजून महेश
आलेला नव्हता.
पप्पा म्हणाले,
'ती वेडी
मुलगी, इकडं
यायला तयारच
होत नव्हती. पण आज तिला
मी राजी
केलंय.
तू आज
रात्री महेशबरोबर
बोल आणि
उद्या सकाहभ्
जाऊन प्रीतीचे
सामान घरी
घेऊन ये. बरं,
मी आत
झोपायला जातोय. महेश आला की
दोघं मिळून
जेवून घ्या.'
नंतर मीही
फ्रेश झालो
आणि महेशची
वाट बघत
टी.व्ही.ऑन करुन
बसलो.
बसल्याजागी कधी
डुलकी लागली
तेही समजलं
नाही.
बेलच्या कर्कश्य
जाग आली. मी उठून घडयाळ
पाहिले तर
आता अकरा
वाजले होते. दार उघडले.
तो महेशच
होता.
'अरे लक्ष्या,
मिटींग अगदी
सक्सेसफुल्ल झाली. ढाब्याच्याबाहेर जी नवीन
इमारत बांधायची
आहे, तिचं
कॉन्टॅ्रक्ट आपल्यालाच
मिळेल.
शिवाय तिथल्याच
ठिकाणचे फाइव्ह-स्टार
हॉटेलही आपणच
कन्स्ट्रक्ट करु. तशी व्यवस्थाच करुन
आलोय.'
मला अतिशय
आनंद झाला.
'कौंग्रेच्युलेशन्स् ! मग ही
संधी सेलीब्रेट
कराची ना?'
'नाही रे
बाबा, आताच
नको.
अजून दीड
दोन वर्षे
तरी ते
काम सुरु
होण्याची शक्यता
नाही.
मंजुरी अद्यापही
आलेली नाही. येईल तेव्हा मात्र
आपल्यालाच ते
काम मिळेल. बरं,
तू अजून
जेवण्यासाठी थांबला
असणारच.
तिथले लोक
मला थांबण्याचा
आग्रह करत
होते पण
मला तुझी
खोड माहित
आहे.
म्हणून त्यांना
नकार देऊन
सरळ इकडं
आलो.
चल किचनमध्ये. मी फ्रेश होऊन
येतोच.'
जेवताना मी
सकाळपासून घडलेला
सर्व वृत्तांत
त्याला सांगितला. विशेषत: प्रीतीच्या असहाय्य
स्थितीवर जास्त
भर दिला. महेशच्या मनातील खळबळ
त्याच्या चेहऱ्यावर
स्पष्ट दिसत
होती. बराच वेळ तो कांहीच न बोलता शांत बसून होता. ती शांतता असह्य होवू लागली होती.
बर्याच वेळानं त्यानं बोलण्यासाठी तोंड उघडलं आणि माझ्या डोळ्य़ात खोलवर पहात तो बोलू
लागला...
(क्रमश:)
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.