विशेष आभार :
वाचकहो, मागील आठवड्यात प्रकाशित केलेली, “सोंग्या” ही लघुकथा मी पहिल्यांदाच
चंदगडी भाषेतून लिहीण्याचा प्रयत्न केला. या कथेस आपणां सर्वांनी खूपच छान प्रतिसाद
दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आणखी एक विशेष आभार मानायचे आहेत, ते
म्हणजे, माझी कॉलेज मैत्रिण आणि सध्या माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असणार्या,
चंदगडच्याच विद्या पाटील यांचे ! कथा वाचून लगेच फोन करून तासभर माझी शिकवणी घेवून
प्रत्यय वगैरे कसे लागतात याबद्दल सखोलपणे सांगितलंच शिवाय माझ्याकडून प्रत्ययांमध्ये
चुकलेले संवाद नव्याने लिहून पाठवले. आपण जर पूर्वीचे आणि आत्ताचे संवाद पाहिलेत
तर तो फरक आपल्या लक्षात येईल. वाचकहो, आपल्या अशाच प्रेमामुळे मला आणि माझ्या
संपूर्ण टिमला आपण जे प्रोत्साहन देत आहात त्याबद्दल आपल्या ऋणात रहाणेच योग्य !
वाचकहो, अशीच
एक आनंदाची बातमी, कांही महिन्यांपूर्वीची “क्वास्टाक” ही लघुकथा आपणांस आठवत
असेलच, याच लघुकथेचे मुंबईस्थित एका कंपणीने चित्रपट तयार करण्यासाठीचे राईट्स
घेतले असून येत्या मे महिन्यापासून त्याचे चित्रीकरणही सुरू होणार आहे ! अधिक माहिती लवकरच "न्यूज" सेक्शनमध्ये शेअर करेन ! वाचकहो,
खूप खूप आभार....
-अनुप
दीर्घकथा 2 : What The F****…!!!
प्रकरण १
“च्युतिया साला !”-कियाराच्या
अनपेक्षित शिवीने सारं पोलिस स्टेशन कांही क्षण का असेना पण, सारी कामं थांबवून "आ" वासून तिच्याकडं पहात होतं. कस्टडीत मार खाणारा मुन्नाभाईही आपलं ओरडणं थांबवून
तिच्याकडं नजर विस्फारून पहात होता. आपण खूपच भयानक कांहीतरी बोलून गेलोय, याची
जाणीव कियाराला झाली तोवर खूपच उशीर होवून गेला होता. कियारासमोर उभी असणारी तिची
सहकारी पायल, तिच्या शिवीनं अक्षरश: हादरून गेली होती. कियाराची जी “इमेज” तिच्या
नजरेत होती, तिला तडे गेले होते. बर्याच वेळाने सावरून ती झटकन उभी राहिली आणि
तिच्या हाताला पकडून ओढत बाहेर घेवून आली.
“तू काय वेडी
झालीयेस काय गं..? किती मोठ्याने शिवी दिलीस ! श्शी !! तुझ्याकडून ही असली अपेक्षा
नव्हती कियारा !”
“पयू, मला
सांग...तुला राग नेमका कशाचा आलाय ? मी शिवी दिल्याचा की मोठ्याने शिवी दिल्याचा
?”-कियारा तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत म्हणाली.
“मला राग
कोणत्या गोष्टीचा आलाय माहितीये किया ? तू त्या बिचार्या मुलाला शिव्या देतीयेस,
ज्याला तू भेटलेली नाहीयेस आयदर ओळखही नाहीयेस ! तुला कसला एवढा राग आलाय, तुला
नकार दिल्याचा !? मोठी विश्वसुंदरी लागून गेलीस की काय तू !”
“नसेन मी मिस.
वर्ल्ड वगैरे ! पण, हाऊ डेअर ही टू रिजेक्ट मी !? माझ्यासारखी मुलगी मिळाली असती
का म्हणावं, कोंबड्या !”-कियारा
“हो का !
आलीये मोठी !! असं बोलतीयेस, जसं की तू त्याला होकारच देणार होतीस !”
“मुळात ह्या
असल्या अरेंज-बिरेंज मॅरेजवर मला विश्वास नाहीये ! तरिही आईनं जेंव्हा त्याचा
फोटो दाखवला, तेंव्हा बरा वाटला पण साल्यानं मी कांही उत्तर द्यायच्या आधीच नकार
कळवला ! माझ्यासारख्या क्राईम ब्रॅंचच्या इन्वेस्टीगेशन इन्स्पेक्टरला रिजेक्ट
करायची हिम्मत तरी कशी झाली साल्याची !”
“किया, काय
चाललंय तुझं ? किती शिव्या घालणारेस त्याला ! तू ड्युटीवर आहेस याचं तरी भान बाळग गं कन्ये !”
“हो
गं...ड्युटीवर आहे म्हणूनच एवढ्या कॉन्फिडन्सने शिव्या देतीये !”-कियारा हसत
म्हणाली.
कियारा आम्रपाली. ज्यांच्या घरात
शिक्षक सोडून दुसर्या कोणत्याही पेशात काम करण्यास इच्छुक असणारे बाळ जन्मालाच
येवू शकत नाही, अशी समजूत असणार्या कट्टर, पिढीजात शिक्षकी काम करणार्या खानदानात
जन्माला आलेली कियारा. लहानपणापासून चौकस. भारतभूषणच्या चित्रपटांमधून देशप्रेमाचे
घोट पिणारी आणि जे.पी.दत्ताच्या चित्रपटांना धर्मग्रंथासम मानणारी कियारा.
लहानपणी, सार्या मुंग्या एका मागोमाग एक जातात कुठे ? याचा छडा लावता-लावता,
निरनिराळ्या प्राण्यांच्या, पशूच्या, मग मोठ्या भावाच्या, आई-बाबांच्या, गल्लीतील
मित्र-मैत्रिणींच्या गुप्त बातम्या मिळवण्यापासून ते आठवीत असताना, गीताच्या
डब्यातील अर्धा थालीपीठ कोण चोरला ? इथवर मजल मारणारी कियारा. बी.एस्सी.
केमिस्ट्री करून स्पर्धा परिक्षा पास होवून, कठोर मेहनतीने ट्रेनिंग टॉप करून अखेर
कियारा तिच्या आवडत्या पेशात सन्मानाने सामील झाली होती. अतिशय कमी वेळात तिने
क्राईम ब्रॅंचमध्ये जागा मिळवून स्वत:ला सिध्द केलं होतं. अनेक मोठ-मोठ्या
केसेसमध्ये कियाराने आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं होतं. पण असं असलं तरी मुलगी
म्हणून आई-वडिलांची काळजीही तितकीच अर्थपूर्ण होती. मुळात हेकेखोर स्वभाव, तापट, लहान-मोठं
कोण समोर आहे याचा विचार न करता, तोंडावर शिव्या घालून रिकामी होणारी, त्यात भरीस
भर म्हणून की काय क्राईम ब्रॅंचमध्ये आणि तेही शोध विभागात !
“ह्या
भें***** मुलांचे डोळे-बिळे फुटलेत की काय ! की साला, मजनूची औलाद जन्माला यायचीच
बंद झालीये, कुणास ठाऊक ! तरुणपण पेटून राख व्हायची वेळ आली तरी एकपण साला कधी
प्रेमाने जवळ येवून प्रपोज करेल तर शप्पथ !”
“एकापेक्षा एक
मजून जगात आहेत किया पण समोर येणार्या पोरांची आई-बहिण काढल्यावर कशाला कोण तुझ्या
सावलीला उभं राहिल !”
“काय अर्थ आहे
यार याला ? एकाच्या पण बुडात दम नसावा...!”
“किया, तुझा
प्रॉब्लेम कायये माहितीये ? तुझ्या सर्व-सामान्य मुलींसारख्या अपेक्षा पण आहेत आणि
सर्व-सामान्य मुलींसारखं वागायलाही नको वाटतं ! तूच सांग, किती मुलांनी तुला प्रपोज
केलं ! पण एट द एंड तू काय केलंस ? एक तर त्यांची आई-बहिण काढायची नाहितर,
इन्व्हेस्टिगेशन करून त्याचा भूतकाळ शोधून त्याला फाट्यावर मारायचं !”
“अफकोर्स यार
! मग काय, प्रत्येक मुलीला गोड-गोड बोलून, भुरळ पाडून फिरवणार्या पोरांसोबत
रिलेशनशीप करू का ?”
“किया, एक
गर्लफ्रेंडव्रता मुलगा ही अंधश्रध्दा आहे ! एण्ड सो ईज विथ मुलगी !! आजच्या
फास्ट-फूडच्या जमाण्यात एखादा मुलगा किंवा मुलगी ही व्हर्जीन असणं ही अभिमानाची
गोष्ट नाहीये...! लोकं लगेच भुवया ऊंचावतात...बहुतेक हिच्यातच किंवा त्याच्यातच
कांहीतरी प्रॉब्लेम असावा ! कळलं...मिस. कियारा...?”
“कांहीही
बकवास पयू..!”-बोलता बोलता अचानक कियारा आठ्या घालून पायलकडं पाहू लागली,
“पयू, डोन्ट
टेल मी, आर यू नॉट व्हर्जीन ?”
“व्हाय शुड आय
? काय लोणचं घालायचंय ??”-पायल हसत म्हणाली होती.
कियारा या
धक्क्यातून पुढचे आठ दिवस बाहेर आली नव्हती. कियारा पायलला विचारायची आणि पायल हसत
निघून जायची. कियारासाठी खूपच भयानक होतं हे सारं. वर-वर मोठ मोठं बोलणारी कियारा
या विषयावर मात्र खूपच रिजर्व्ह्ड होती. वयाची २८ वर्षं उलटून गेलेली कियारा आता
मात्र कमालीची गंभीर झाली होती. पण सुरूवात कुठून करायची इथंपासून तिला आता
पायलकडून ट्रेनिंग घेणं जरूरीचं होतं.
या सार्या गंभीर माहौलमध्येच अचानक
एक दिवस कियाराला एक स्थळ आलं. आईच्या आत्त्याच्या जवळच्या मैत्रिणीच्या बहिणीच्या
दिराच्या मित्राचा भाऊ ! खूपच जवळचं नातं !! त्यामुळं आईला कांही बोलायची सोय
नव्हती. जरा बोलायची फुरशत,
“आमच्या
शब्दाला किंमतच नाही...! बापाला नाही ते नाही, आता पोरं पण किंमत देत नाहीत...मीच
मुर्ख म्हणून पोरीच्या भल्यासाठी स्थळ काढलं...मलाच मेलीला अक्कल नाही....रहावत
नाही....आईचं आतडं...”
वगैरे वगैरे ऐकून घेण्य़ाशिवाय पर्यायच शिल्लक रहात नव्हता. एके रात्री डायनिंग टेबलवर जेवता-जेवता आईनं खुशीत येवून हळूच मुद्द्याला हात घातला. आत्त्या कित्ती भारीये, किती प्रेम करायची, तिच्या आईच्या माघारी तिनं कशी आईसारखी माया केली, मग येणं-जाणं कसं वाढलं, तिच्या मैत्रिणींच्या कशा ओळखी झाल्या, कित्ती भारी मैत्रिणी आहेत आत्त्याच्या, नुसत्या मैत्रिणीच नव्हे तर त्यांच्या फॅमिलीजही किती प्रेम करतात-काळजी करतात, एवढंच कशाला आत्त्याच्या मत्रिणींच्या बहिणींच्या लग्न झालेल्या फॅमिलीजही कित्ती ग्गोड आहेत, भरीत भर म्हणून त्या बहिणींची, नवर्य़ांची, दिरांची मित्र-मंडळी कित्ती भारी आहेत, अशाच एका दिराचा मित्र, त्याचा लहान भाऊ कियारासाठी कसा लाखात एक आहे हे पटवून देताना आईचे डोळे २४ कॅरेटच्या हिर्यापेक्षा जास्त प्रखर तेजाने चकाकत होते ! कियाराचा मोठा भाऊ कैलाश, कियारा आणि वडिलांनी एकमेकाकडं नजर टाकली आणि आपापली हतबलता दर्शवली. उसन्या अवसानाने आईकडे पाहून सारे फेक स्माईलने ऐकत होते. आई जशी फोटो आणायला बेडरूमच्या दिशेने पळाली, तशी कियारा वडिलांच्या कानात पुटपुटली,
“हि काय
डोक्यावर पडलीये काय ! इतरवेळी बसलेली खुर्ची लवकर सोडवत नाही, गुडघे दुखतात
म्हणे, आणि आता बघा कशी टुणकन उडी मारून पळाली...”
“किया, माईण्ड
युवर लॅंग्वेज ! हज्जारदा सांगितलंय, तुझ्या ऑफीसची भाषा तिथंच सोडून यायची ! जरा
तरी मुलगीसारखी वाग-बोल...”-बाबा तिला समजावत म्हणाले.
यावर न रहावून
कैलाश दात विचकून हसला आणि आपल्या स्वभावधर्माला जागून कियारा फाटकन म्हणाली,
“गप जेव
ना...भें.....भेंडी !”
“किया...”-बाबा
ओरडले
“सॉरी ! पण माझा
नकार पक्काये...”
हे सारं सुरू
असतानाच आई त्या मुलाचा फोटो घेवून बाहेर आली आणि कौतुकाने तो त्या तिघांना दाखवू
लागली.
“याचं नाव
सोहम ! कन्सल्टिंग सायकोलॉजिस्ट आहे हा !! स्वत:ची ओ.पी.डी. आहे त्याची शिवाय एका
मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्येही प्रॅक्टिस करतो हा !”
“चांगली
जोडीये ! तो वेड्यांचा डॉक्टर आणि ही ठार वेडी !” कैलाश तिला चिडवत म्हणाला.
त्याच्या
वाक्यावर कियानं जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला. तिच्या रागानं खूष झालेला कैलाश
तिला चिडवण्यासाठी म्हणाला,
“आई...बेश्टये
मुलगा...मला आवडला जिजू म्हणून !”
“कैलाश !”-बाबा त्याला शांत करण्यासाठी जरबेनं म्हणाले, “तुला खरंच वाटतो हा मुलगा आपल्या
कियासाठी योग्यये ?”
“हो...मी
माझ्या मुलीसाठी आलतू-फालतू स्थळ काढेन का ? अहो, तो काय वेड्यांचा डॉक्टर नाहीये.
मोठ-मोठी लोकं त्याच्याकडं सल्ला घ्यायला जातात ! आणि सल्ला देण्याची घसघशीत रक्कम
घेतो म्हणे तो. वय तरी काय पोराचं २९ पण स्वत:च्या कमाईतून मर्सिडीज घेतलीये म्हणे
परवा ! आपल्या कियासाठी सुयोग्य स्थळ आहे हे ! काय म्हणतेस किया ? आवडला का ? अहो
बघा, बघा...कश्शी लाजतेय, गाल लाल झालेत पोरीचे लाजून !”
“आई, याला
लाजणं नाही चिडणं म्हणतात आणि चिडल्यावरही गाल लालच होतात...फॉर युवर काईंड
इन्फॉर्मेशन !”-किया फणकार्यानं उठली आणि निघून गेली.
“अश्शी काय ही
!”-आई
नक्की काय झालं होतं कियाला ? आई फोटो
घेवून यायच्या अगोदरच तिनं मनात ठरवलं होतं,
“साल्याला
नकारच द्यायचा !”
आणि अचानक
त्याचा फोटो बघून कियाच्या मनात कांहीतरी झालं होतं. कियाला राग आला होता खरा पण तो
स्वत:वर ! कारण वडिलांसमोर मोठ्या घमेंडीत ती, “माझा नकार पक्काये..” असं बोलून
बसली होती आणि आता माघार घेणं म्हणजे शेपूट घालण्यासारखं होतं, जे कियाच्या
रक्तातच नव्हतं. खोलीत येवून दार बंद करून गादीत मान खूपसून आणि डोक्यावर ऊशी
ठेवून किया मोठ्याने ओरडली होती,
“फ*** यू किया
!!!”
स्वत:लाच शिवी घालून किया ऊशांची फेका-फेक करत होती. असं या अगोदर कधीच झालं नव्हतं. काय होतं हे ? कांहीतरी वेगळ्याच फिलींग्ज तिच्या मनात उमटत होत्या. आतून अचानक अस्वस्थताही वाटत होती आणि मोहरल्यासारखंही झालं होतं. कियारासाठी सार्याच नवीन भावना होत्या ह्या ! दुसरे दिवशी कधी एकदा पायलला भेटते आणि सारं सांगते असं तिला झालं होतं. अचानक कियाराच्या डोक्यात ट्यूब पेटली. तिनं आपला मोबाईल उचलला आणि ट्विटर, ईन्स्टा, फेसबुक, लिंक्ड-ईन, टेलिग्राम अशा मिळेल त्या सोशल-मिडीया साईटवर त्याला शोधण्याचा प्रयत्न केला.
“काय मुर्ख
मुलगाये ! सोशल मिडीयाच्या जमान्यात कसा-काय बरं हा कुठंच नाहीये !?”
मघापासून शांत
असणारं तिचं प्रोफेशन तिच्या मनात वळवळू लागलं,
“कांहीही होवू
दे..याची माहिती तर मी काढणारच !!”
सुरूवातीला
अतिशय गांभीर्यानं आणि मग स्वत:च लाजून कियानं आपलं डोकं ऊशीत लपवलं !
(क्रमश:)
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.