Pen


लेखकाच्या डोक्याची ऐशीतैशी !!!-चैताली गानू

वाचकहो,

आजचा ब्लॉग अनुपने लिहीला नसून तो मी स्वत: लिहीत आहे. यामागं कारणही तसंच आहे. खरं तर रागखदखद आणि त्रागा आहे. आम्हां लेखकांना आजच्या सो-कॉल्ड व्यावसायिक जगात खरंच किंमत नाही का ? आम्ही नव-नवीन कल्पना शोधायच्यात्यासाठी तहान-भूक विसरायची आणि लोकांनी आयत्या कल्पना चोरून चित्रपट/लघुपटांची निर्मीती करायची !बरं या प्रवृत्ती विरोधात एक्शन घ्यायची म्हंटलं तरीयांच्या धमक्या ठरलेल्या ! पैशाच्या जोरावर माजोर्डी झालेली ही औलादयांना रोखायचं कसं ?

गेल्या महिन्याभरापासून अनुपचे ब्लॉग-कथा अपडेट झाल्या नाहीत म्हणून उत्सुकतेपोटी त्याला फोन केलातेंव्हा सारी परिस्थिती कळली. गेल्या महिन्या-दोन महिन्यात त्याच्या २ कथा चोरल्या गेल्या असून त्यावर लघुपट आणि एक हिंदी चित्रपट निर्मीतीचे काम सुरू आहे.त्यामुळे त्यानं ब्लॉग लिहीणं कमी किंबहुना जवळ-जवळ बंद केलं आहे ! आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहित नसेलनुकतीच त्याच्या एका स्क्रिप्टवर एका मोठ्या निर्मीतीसंस्थेने एका मराठी चित्रपटाची निर्मीती केली ! चित्रपट तयार झालारिलीज झाला !!  मग अशावेळी एक प्रश्न मनात येतोकुठवर नेकी कर दरिया में डालअसे करावयाचे ? या सार्‍या त्राग्यापोटी जे लिहीले गेलेते आपणांसोबत शेअर करत आहे....

 

-चैताली गानू (लेखिकास्टार प्रवाह प्रोमो रायटरमुंबई)

 

कस आहे मुळात लेखक हा प्राणी फार काही वेगळ करत नाही अस वाटत असल तरी स्वतःची कोणतीही संहिता लिहिताना तो फार वेगळच लिहित असतो. तस नसत तर महाभारत फक्त लिहिण्यासाठी बाप्पाला जास्त फुटेज नसत का मिळाल?नाही त्याच्या लिखाणाच्या कौशल्यावर कोणतीही शंका किंवा मजा करण्याची कुवत नाही(नाहीतर फक्त तीच ओळ पकडून गदारोळ उठवला जाईल आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहील)

तर मुद्द्यांच अस कीव्यास आणि महाभारत हे समीकरण पुढची कैक वर्ष असच राहणारे. पण खरी मजा अशी आहे कीव्यासानी ह्या काळात  अस काही लिहील असत तर बिचाऱ्यांना त्यांच्या concept साठी writers association किंवा तत्सम लेखकाना;नावाला अभय देणाऱ्या associations ना रोज साकड घालाव लागल असत. आणि त्यांच्या concept वर भरभरून movies करणाऱ्यावर रोज खटले भरावे लागले असते. म्हणा खटले भरून नी साकड घालून चोरी करणारे चोर काही पकडले गेलेच नसते. कारण चोरी झालीये हेच सिद्ध होईस्तोवर लेखकाला पुढच्या जन्माचा जीवनगौरव मिळाला असता.(उगाच sarcasm फेकण्याचा प्रयत्न केला)

 असो पण म्हणून चोराची चोरी माफ केली जाऊ शकत नाही. कस आहे लेखक स्वतःचा वेळ जात नाही म्हणूनएखादी concept लिहित नाही. चला आज जरा डोक्याला आणि हाताला खाज सुटतेय तर लिहुयात. असे रिकामटेकडे धंदे जास्त कोणी करत नाही तर आपण करू ह्यासाठी लेखक लिहित नाही.आणि लिहित जरी असला तरी त्याच्याच ताटात खाऊन त्याच्याच बुडाला हात पुसण्याचे बुडछाप धंदे करण्याचा हक्क त्याच्या कोणत्याही वाचकाला नाही. नाही एखादा म्हणेल आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. आहातच की तुम्ही मायबाप(इथे मायबाप म्हणजे वाचकवर्ग असा अर्थ घेण अभिप्रेत आहे)तुमच्यासाठीच तर लेखक लिहितो.पण म्हणून मायबाप म्हणत म्हणत बुडछाप धंदे केले जाऊ लागले तर लेखकाने शब्दांच्या चपलांचे हार घालण अनिवार्य आहेच. नाही आजच्या काळात हे अस होतच अस म्हणत जर move on लेखकाने सारख सारख करायचं असेल. तर त्याच्या लेखणीने त्या चोरालाही वेळोवेळी चेचलच पाहिजे. जसा मायबापाला आपल्या लेकराचा कान पिळायचा हक्क असतो तसच वेळेला लेकराला हि मायबापाला खडसावण्याचासारख सारख हे खपवून घेतल जाणार नाही हे अतिशय प्रेमाने समजावण्याचा हक्क असतो.

तेव्हा मायबापानो तुमच्या नकळतकळत अशी चोरी झाली असेल तर मनातल्या मनात तरी मान्य करून टाकली तरी केलेल्या कर्माची फळ इथेच भोगायची आहेतच की. लेखक एक concept चोरली गेलीती दुसरया कोणाला तरी विकून त्यावर सिनेमाची तयारीही सुरु केली गेली म्हणून रडत बसलेलाही नाहीये. पण पुढच्या वेळेला अशा झकमारी करणाऱ्या चोराची गय केली नाही जाणर. लेखकाच्या डोक्याची ऐशी तैशी करणाऱ्या असल्या चोराला copy write ची भीती वाटत नसेल तर बुडछाप चोराला रीतसर नाव घेऊन ठेचण्याची अजिबात भीती वाटणार नाही.....बाकी सुजाण,प्रामाणिक आणि खऱ्या वाचकांना लेखक कायम ऋणी असेलच....

-चैताली

 

Pen Image

Pen Index