(उत्तरार्ध...)
राधिकावरचा
झोत हळू-हळू कमी होतो आणि सपनावरचा झोत सुरू होतो.
सपना : वक्त निघून चालला होता. उमर पण चढतीला होती. वडिलांचा इंतकाल
झाला
आणि अम्मीही
जग सोडून निघून गेली. मी मोहल्ल्यात आले तेंव्हा
रोज पहाटे
उस्ताद हदात अली खॉं साहेबांच्या गच्चीवरून ऐकू येणार्या गाण्याच्या
हरकतींनी जाग
यायची आणि तडक त्यांच्या हवेलीच्या दारात जावून बसायचे.
सकाळी
ऐकलेल्या हरकती काम करताना गुणगुणायचे. सतत ६ वर्षं दारात उभं
राहूनही त्या
दाराची पायरी आजवर कधी ओलांडायला मिळाली नव्हती की,
बाहेर येवून
खॉं साहेबांनी कधी माझी विचारपूसही केली नव्हती. पण माझा
दिनक्रम
मात्र कधीच चुकला नव्हता. आताशा सवयच होवून गेली होती.
खॉं
साहेबांचा आवाज ऐकू यायच्या आधीच मी उठून बसू लागले होते. एक दिवस
सवयीप्रमाणं
उठून बसले पण साहेबांचा आवाज ऐकू आला नाही. दोन दिवस
झाले...तीन
दिवस झाले पण आवाज कानावर पडला नाही. मी अस्वस्थ झाले.
भल्या-बुर्या
विचारांनी हैराण करून सोडलं. नोकर आत सोडेनात. दोन आठवडे
होत आले
होते. दिवस संपता संपत नव्हता. बेचैनी असायची. एके दिवशी भल्या
पहाटे
साहेबांच्या दारात जावून उभी राहिले आणि त्यांच्यासारख्याच
हरकती घेवून
मी स्वत: लिहीलेली ‘चीज’ गावू लागले.
(तानपुर्याचा
आवाज येवू लागतो-)
लागे ना, मन
कि सितार...
लागे ना....
मन की सितार
!
धुंधली सी
रात...
मन में
सुवाल...
धुंधली सी
रात !
चुरिया गैरत
फितूर...
चुरिया...
गैरत
फितूर...
मन कि
सितार... लागे ना... मन कि सितार !
राधिका : (तिच्यावरचा
आणि त्या स्त्री वरचा लाईट सुरू होतो-) मोजझा !
स्त्री : मोजझा ! म्हणजे ?
राधिका : आश्चर्य
! मिरॅकल !!
स्त्री : कसलं ?
राधिका : आपल्याच
नियमांना तोडून खॉं साहेब स्वत: तरातरा दारात येवून
उभे राहिले.
३८-४० ची उमर, डोक्यावर फरची टोपी, अंगाभोवती मखमली
शाल, पायात
मोजड्या, हातात मोत्यांची माळ आणि तोंडाने कुराणमधील
आयतांचं
स्मरण करताना होणारी ओठांची अस्पष्ट हालचाल, उभ्या चेहर्याला
शोभणारी दाढी
आणि विस्फारलेले डोळे. आपाला झालेलं खॉं साहेबांचं
हे पहिलं
दर्शन ! दोघेही एकमेकांच्या नजरेत बराच वेळ पहात राहिले. आणि
बर्याच
वेळानं भानावर येवून त्यांनी आपाला जवळ बोलावलं आणि विचारलं,
“नाम क्या है
आप का ?”
राधिका : “वाकई
!?”
सपना : जी !
राधिका : “ईस
खुबसूरत सेहेर में वाकई सपना हो !”
सपना : (वळते. लाजते-) या अल्लाह ! ज्यांच्या दिदारसाठी इतकी वर्षं
तरसत होते,
तेच आज समोर
उभं राहून माझी तारीफ करत होते.
राधिका : आपाला
कांहीच सुचेनासं झालं. खॉं साहेबांच्या तारीफने आपा लाजून लाल
झाली होती.
गोर्या-सरळ नाकाचा शेंडा तांबडा झाला होता. पायाचा अंगठा
मातीत रुतवून
आणि त्यांच्या पायाशी आपल्या नजरा रोखून अधीर झालेल्या
आपाचे ओठ
थरथरू लागले होते. छातीत धडधड वाढली होती. श्वास जडावले
होते. “किस
घराणे से हो ? कहॉं सिखा ??”
सपना : किसी घराणे से नहीं, पर सिखा आप ही से है !
राधिका : “आफरिन
! सुभान अल्लाह !! आप मेरे घराणे में शामिल होना चाहेंगी ?”
(हसते-) इतका
प्रश्न आपाला भोवळ येण्यासाठी पुरेसा होता !
साल-दरसाल
निघून गेले. आपाच्या गळ्याला बैठक आली होती. येणारा
प्रत्येकजण
आपाचं कौतुक करत निघून जायचा. आपाला मोठमोठ्या कार्यक्रमांची
निमंत्रणं
येवू लागली. अनेक गाण्याच्या कार्यक्रमांना आपा असेल तर लोकांच्या
उड्या पडू
लागल्या. खॉं साहेब आपल्या या शिष्येच्या कर्तृत्वाने भारावून गेले
होते. लोक
जेंव्हा म्हणत, “खॉंसाब, ये तो आप से एक कदम आगे है..!”
तेंव्हा
खॉंसाहेब आदबीने कानावर हात ठेवून वर अल्लाहकडे नजर टाकून म्हणत,
“खुशी
है...उसकी मेहेर है !”
सपना : सब ठिक ही चल रहा था । मी माझा सपना जगू लागले होते. माझ्या
ईलाहीच्या
नजरेखाली
तयार होत होते. माझी खुशी सातवे आसमॉंवर होती. खॉंसहेबांना
माझ्याकडून
खूप अपेक्षा होत्या. त्यांच्या कलेची कदर कुणीच केली नव्हती.
त्यांना
वाटायचं, जे मला मिळालं नाही, ते माझ्या शागीर्दला मिळावं...मिळेल !
पण एक गुनाह
करून गेले, ज्याच्या आगीत आखीरपर्यंत जळत राहिले.
राधिका : एक
दिवस खॉं साहेबांनी विचारलं, “बताईये, क्या तोहफा चाहिए आपको ?”
आणि कोणताही
पुढचा मागचा विचार न करता आपा म्हणाली होती,
सपना : मैं आप से निकाह करना चाहती हूं...
राधिका : त्या
दिवसापासून आपाला हवेलीची दारं कायमची बंद झाली. त्यानंतर कधीही
तिला खॉं
साहेबांचं दर्शन झालं नाही. आपानं स्वत:लाही आपल्या दुमजली घरात कोंडून घेतलं. आपल्याच दु:खात बुडून राहू लागली. एक
दिवस...खॉं साहेब सारं सोडून
निघून गेले. सार्या मोहल्ल्यानं मातम पाळला होता. सारे विधी पार
पडल्यावर
हवेलीचा नोकर आपाच्या घरी आला आणि खॉं साहेबांनी,
आपण मेल्यावर
द्यायला सांगितलेली चिठ्ठी, देवून तो निघून गेला. चिठ्ठी वाचून,
धायमोकलून
रडून, चिठ्ठीला छातीशी कवटाळून कितीतरी वेळ विलाप केला होता
आपानं. खॉं
साहेबांनी त्या चिठ्ठीत लिहीलं होतं,
“अगर मुझे
जिंदा रखना चाहती हो, तो गाने से रुसवाई मत करो !”
पुन्हा गायला
सुरूवात केली. नवीन मुला-मुलींना शिकवायला सुरूवात केली पण
तिची दखल
मात्र कुणीच घेतली नाही. आपानंही कुणी दखल घ्यावी म्हणून कधी
शिफारसही
केली नाही. ती गाण्यावरच्या प्रेमापोटी आणि खॉंसाहेबांवरील
श्रध्देपोटी
गात राहिली.
सपना आत निघून
जाते. सगळीकडे प्रकाश पडतो.
स्त्री : इंट्रेस्टिंग ! पण यात कुठेच मला त्यांनी समाजासाठी, या
शहरासाठी योगदान
दिल्याचं
दिसलं नाही !!
राधिका : (स्वत:वर
ताबा ठेवत-) तुम्हाला काय म्हणायचंय ? तिनं पैसे न घेता मुला-
मुलींना
शिकवलं, तुटपुंज्या मानधनावर मैफिली केल्या, संमेलनातून बंदीशी
सादर केल्या
याची तुमच्यालेखी कांहीच किंमत नाही ?
स्त्री : असं कुठं म्हंटलं मी ? पण, शासनाकडून दर महिना रक्कम मिळणार
म्हंटल्यावर,
शासनदरबारी दखल घेण्याजोगं काय काम केलं हे तर पहावंच
लागेल ना !
सपना आपा : (आत
येत-) राधिका, बेटा कुणाशी बोलतीयेस ?
स्त्री : (उठून हात जोडते-) नमस्कार ! मी पालिकेकडून माहिती
घेण्यासाठी आले आहे.
सपना आपा : कसली
माहिती ?
राधिका : कांही
नाही गं आपा, तू सरकारचा किती लाळघोटेपणा केला आहेस ? हे
विचारायला
आल्या आहेत त्या !
स्त्री : (तिचा आवाज वाढतो-) एक्सक्युज मी !
राधिका : हे
बघा मॅडम...
सपना आपा : राधिका...शांत
हो ! मॅडम, तुम्हीही शांत व्हा. बसा. बोला काय बोलायचंय ?
स्त्री : (बसत-) मी पालिकेच्या सांस्कृतिक खात्याकडून आले आहे.
शासनाने स्थानिक
कलाकारांसाठी
मानधन योजना सुरू केली आहे. मूळचे इथले आणि बाहेरून येवून
स्थायिक
झालेले, असे दोन गटात विभागणी करून, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन
करून
त्यानुसार त्यांच्या मानधनाचा आकडा ठरवण्यात येणार आहे.
सपना आपा : बरं
! कोण करणार मूल्यमापन ? आपण ??
स्त्री : हो.
सपना आपा : वा...छान
! कोणती कला येते तुम्हाला, गायन, वादन,लेखन, अभिनय, चित्रकला,
नृत्य..? ६४
कलांपैकी तुम्हाला कोणती येते ?
स्त्री : छे..! सांस्कृतिक विभागात सिनीअर सुपर-वायझर आहे मी आणि
अधिकार्यांनीच
आम्हाला ही
कामगिरी दिली आहे.
सपना आपा : असं
म्हणता ! छान !! मग, अधिकार्यांना तरी एखादी कला येत असेलच की !
स्त्री : (हसत-) छे हो ! कला-क्रिकेट आणि राजकारण यांचं मूल्यांकन
करायला
ते थोडंच
यावं लागतं ? (हसते-)
सपना आपा : अगदी
खरंय तुमचं ! पण तुमच्यासारखे हजरजबाबी अधिकारी आहेत म्हंटल्यावर
मग
आमच्यासारख्या कलाकारांना घोर नाही ! माझ्याकडून काय माहिती हवी
आहे
विचारा...
स्त्री : अगदी फार कांही नाही, किरकोळ ! तसंही यांनी तुम्ही
येण्यागोदर तुमच्याबद्दल
बरीच माहिती
सांगितलीये ! फक्त आता प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरं हवीयेत.
विचारू ?
सपना आपा : विचारा.
स्त्री : (तगड समोर धरते आणि पेन हातात धरून, वाचू लागते-) मातृभाषा ?
सपना आपा : मराठी
आणि ऊर्दू-हिंदी.
स्त्री : हं ! पण या स्थानिक भाषा नाहीत. तुम्हाला स्थानिक भाषा बोलता
येत नाही ?
सपना आपा : नाही.
स्त्री : का ?
सपना आपा : कारण
मला भ्रम झाला होता की, मी भारतात रहाते आणि भारताची राष्ट्रभाषा
हिंदी आहे,
त्यामुळे हिंदी येत असेल तरी या देशात तग धरता येवू शकतो.
स्त्री : (चपापते-) मग स्थानिक भाषा शिकावी असं वाटलं नाही का
तुम्हाला ?
सपना आपा : नाही.
कारण, इथं येणारा हरेकजण एकतर मराठीत किंवा हिंदीत बोलतो.
आपणही
आल्यापासून मराठीतच बोलत आहात !
स्त्री : तुम्हाला स्थानिक भाषा येत नसेल आणि तुम्ही स्थानिक भाषेतून
तुमची कला
सादर करू शकत
नसाल तर, शासनाने तुम्हाला मदत का करावी ?
सपना आपा : अजिबातच
करू नये ! मी तर म्हणते, स्थानिक भाषा न बोलणार्या सगळ्यांनाच
शासनाने
हकलून द्यावे, त्यांचे इतकी वर्षे घेतलेले टॅक्स परत करावेत आणि पुन्हा
त्यांना पाय
ठेवू देवू नये !
स्त्री : म्हणजे, तुम्हाला असं म्हणायचंय का, तुम्हाला शासनाची मदत
नको आहे ?
सपना आपा : मॅडम,
मी कांहीच म्हणत नाहीये. सगळं तुम्हीच म्हणताय !
स्त्री : हे बघा सपना आपा, तुम्ही तुमचा हा ताठा सोडला नाही तर,
तुम्हाला मदत
करणं अवघड
जाईल आम्हाला !
सपना आपा : राधिका
बेटा, मी ताठा दाखवतीये यांना ? तुमचा कांहीतरी गैरसमज होतोय.
तुम्ही
ज्याला ताठा समजताय तो ताठा नाही, स्वाभिमान आहे ! आयुष्यभर
नि:स्वार्थीपणे
कलेची सेवा केली, कलेसाठी घरदार, आई-वडील मागे सोडून
आले, स्वत:ची
ओळख पुसली यातून आलेला स्वाभिमान ! (स्मित-)
स्त्री : तुमची स्थावर मालमत्ता किती आहे ?
सपना आपा : कलाकाराची
कितीशी मालमत्ता असणार ? हा वाडा काय तोच आता शिल्लक
आहे.
स्त्री : तुमचे उत्पन्न आणि उत्पन्नाचे साधन काय ?
सपना आपा : वरच्या
दोन खोल्यांत मी, राधिका आणि जुनैद रहातो आणि बाकीच्या सगळ्या
खोल्या
भाड्याने दिल्यात. त्यातून जी रक्कम मिळते त्यातच गुजराण करतो !
सपना आपा : त्याच्यावरही
मानधनाची रक्कम ठरणार आहे का ?
स्त्री : (ओशाळून-) नाही...नाही. मी सहजच उत्सुकतेपोटी विचारलं.
सपना आपा : जुनैद
पूर्वी खॉंसाहेबांकडे काम करायचा !
स्त्री : कोण खॉंसाहेब ?
सपना आपा : (तिच्याकडे
आणि मग राधिकाकडे चमकून पहातात-) उस्ताद हदात अली खॉं
साहेब !
स्त्री : कोण होते ? कधी नाव नाही ऐकलं ! इथंच रहायचे कि परमुलुखात ?
सपना आपा : (मोठ्याने
हसते-)
शबनम के
काफिलें बनें भी तों,
पयमाने
जुस्तजू कहॉं मंजिल पाएंगे ?
कतरा भी हो
जिंदगी,
मराजिम परवाज
तभी पाएंगे !
स्त्री : मी समजले नाही !
सपना आपा : जरूरत
नही है ! खॉंसाहेब याच मातीत जन्माला आले आणि याच मातीत
त्यांचा
इंतकाल झाला ! अफसोस याचाच आहे की, कुणीच त्यांची कधीच
दखल घेतली
नाही ! तर, जुनैद खॉंसाहेबांकडे काम करायचा, त्यांचा इंतकाल
झाल्यावर तो
माझ्याकडे येवून माझा मदतनीस म्हणून काम करू लागला.
स्त्री : आणि राधिका ?
सपना आपा : (तिच्याकडे
प्रेमाने पहाते-) कचराकुंडीत कोणीतरी टाकून गेलं होतं तिला.
पहाटेच्या
शांतवेळी रियाजाला उठले असताना तिच्या रडण्यानं अस्वस्थ
होवून मी
बाहेर पडले. वाड्याजवळच्याच कचराकुंडीत बिचारी रडत पडली
होती. एक-दोन
हरामखोर कुत्री तिला फाडण्याच्या तयारीत होती. गडबडीनं
पुढं झाले
आणि हिला उचलून छातीला कवटाळलं. हिच्या गळ्यात एक काळा
धागा होता,
ज्याला एक चिठ्ठी लावून त्यावर “राधिका” लिहीलं होतं ! म्हणून
ही राधिका !
मॅडम, मला एक सांगता...? समजा, हिचं नाव त्यावेळी बदलून
आफरिन, लैला,
तबस्सूम वगैरे ठेवलं असतं तर कांही फरक पडला असता का
हो ? नावाने,
धर्माने नाही फरक पडत...तुमचा नजरिया कसा आहे ? त्यावर
फरक पडतो !
स्त्री : (घसा खाकरते-) तुम्हाला, सांस्कृतिक मंत्रालयाच्या नावानं एक
आर्जव पत्र
लिहून द्यावं
लागेल की, बाहेरून येवून तुम्ही इथंच स्थायिक झाला आहात,
स्थानिक भाषा
येत नसली तरी कलाकार म्हणून कलेची सेवा केली आहे,
म्हणून
बाहेरून आलेल्या कलाकारांसाठीची पेन्शन दरमहा रु. ८५०/-
मिळावी
म्हणून अर्ज सादर करत आहे. त्यासाठी सोबत रेशनकार्ड, आधार यांची
झेरॉक्स
जोडावी लागेल.
सपना आपा : बापरे
! इतनी बडी रकम ?! फारच उपकार झाले शासनाचे !!
पैसे
मिळाल्यावरही लोकं शिव्याच घालतात.
सपना आपा : खरंय
! मॅडम, बरीच वर्षं सरकारी नोकरी करत असाल ना !
स्त्री : हो ना. १६ वर्षं झाली.
सपना आपा : मग
पगारही बरा मिळत असेल ना ?
स्त्री : कुठलं हो ! मर-मर राबून महिना ३५,०००/- मिळतात. पण, या
महागाईत
तुम्हीच
सांगा कसं भागणार ?
सपना आपा : अगदीच
खरंय तुमचं ! (स्मित-) राधिका, बेटा पाणी-चहा विचारलंस की नाही ?
स्त्री : नको...नको..! झालंचये माझं काम, निघते मी ! तेवढं अर्जाचं
बघा. (उठते-)
नमस्कार.
ती निघून
जाते. राधिका रागारागानं तिच्या मागोमाग जाते. सपना आपा हसू लागते. हसू आवरून एक
ख्याल गुणगुणू लागते. राधिका रागानं तिच्या बाजूला येवून उभी रहाते.
राधिका : काय
गरज होती तिला एवढं डोक्यावर घेवून बोलायची ? ती एवढा अपमान
करत
होती...दाखवून द्यायची होतीस ना तिला तिची लायकी !
सपना आपा : बाळा,
जेंव्हा आपण रागानं...संतापानं समोरच्याला लायकी दाखवून द्यायला
बोलतो ना,
तेंव्हा खरंतर आपण आपली स्वत:ची लायकी दाखवून देत असतो !
राधिका : पण
आपा...
सपना आपा : बाळा,
चिडून..त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे ? आपण त्रास करून घेतल्यानं
तिला काय,
कुणालाच फरक पडणार नाही ! आणि बाळा, ज्याला कलेचा अर्थच
माहित नाही,
कला कशाशी खातात हेच माहित नाही, त्याच्याशी हुज्जत
घालण्यात
कांहीच हशील नाही ! हिच तर शोकांतिका आहे बेटा, ज्यांना
कला माहित
नसते, तेच कलेचं मूल्यमापन करतात.
शबाब वो कहर
था,
जो जुस्तजू ना पाया, छलक
गया ।
पयमाने क्या करें कासिद ?
ईक कत्रा थी रंजीश, खुल्द
गया ॥
(हसते-)
यहॉं आओ... (राधिका जवळ
येवून तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसते-)
दुसरे आपल्याबद्दल काय
विचार करतात, याचा विचार आपणच का करायचा ?
तो त्यांचा त्यांना करू
द्यावा. आपण आपल्या कामाशी, कलेशी प्रामाणिक
रहायचं, बस्स !
त्याचवेळी
कानावर कंकालीचा भसाडा आवाज पडतो. मघाचेच गाणे ती म्हणत आहे. दूरून तो आवाज येत
आहे. आपा गॅलरीच्या दिशेने पहाते. ती अस्वस्थ होते.
सपना आपा : बेटा...कंकाली
की आवाज...! जा, तिला बोलवून आण !
राधिका : आपा,
तू तिला भेटणारेस ?
सपना आपा : काय
हरकत आहे ? तीही गाणंच म्हणते. फक्त तिची म्हणायची पध्दत वेगळी
असेल, पैसे
मागण्याची पध्दत वेगळी असेल ! तसं असेल तर, भीक आपणंही
मागतोच की !
फरक इतकाच की, आपण त्याला “मानधन” म्हणतो, जे
मानानं कधीच
मिळत नाही. प्रसंगी भांडून, चढाओढ करून रक्कम ठरवावी
लागते आणि
मागावी लागते. आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं बरीये ती बाळा !
ज्यांना
द्यायचं असतं ते देतात आणि जो जे खुशीनं देईल, ते तीही खुशीनं
घेते.
आपल्यापेक्षा कलेची तिला जास्त कदर आहे. जा, बोलवून आण तिला !
राधिका उठते
आणि बाहेर जाते. आपा गॅलरीच्या दिशेने जाते आणि वाकून पाहू लागते. खाली पाहून
स्मित करते.
सपना आपा : (ओरडून-)
हॉं...आ जाओ...तिच्यासोबत वर ये...
आपा खुर्चीत
येवून बसते. तिचा चेहरा शांत आणि प्रसन्न दिसत आहे. राधिका आत येते. तिच्या
मागोमाग गळ्यात पेटी, फाटकी उत्तर भारतीय पध्दतीने गुंडाळलेली साडी, डोक्यावर पदर.
ती दबकत येते. पेटी काढून दारात ठेवते. गडबडीनं पुढं होते आणि तानपुर्याला, पेटीला आणि मग सपना आपाला वाकून नमस्कार करते. सपना आपा तिला
उठवते. ती आपाच्या पायाशी बसते. आपा कौतुकाने तिच्याकडे पहात आहे.
सपना आपा : पता
है, तू पहिली आहेस...जिने आल्या-आल्या तानपुर्याला, पेटीला
नमस्कार केला
! नाम क्या है आपका ?
कंकाली : तेच
आपलं दैवत है जी ! आणि तुम्ही पण पहिल्याच आहात, ज्यांनी मला
माझं नाव विचारलं !
सपना आपा : अरे
वा ! चांगलं मराठी बोलतेस की !
कंकाली : जी...इथं
येवून ७ साल पूरे झालेत. त्यामुळं जमतं ! काफी दिनों से मन्नत होती,
तुम्हाला
भेटण्याची ! आज पूरी झाली !!
सपना आपा : मला
भेटण्याची ?
कंकाली : जी.
तुमचं नाव खूप ऐकून होते मी. खूप साल पहले, ज्या-ज्या घराण्यात मी
शिकण्यासाठी
जायचे, त्या-त्या घराण्यात तुमचं नाव निघायचं !
राधिका : तू
शास्त्रीय गाणं शिकलीयेस ?
कंकाली : घराण्यात
सामील व्हायची कोशीश तरी केलेली, पण किसीने नहीं लिया.
सगळे
म्हणाले, तुझ्या आवाजात वो बात नहीं ! निराश होवून गावी जात होते.
रेल्वेत
कंकालींचा घोळका भेटला आणि मग त्यांच्यासोबत गाणी म्हणत
फिरत राहिले.
(हसते-) कंकालीनं सूरात नाही, फाटक्या आवाजातच म्हणावं
लागतं, हा
पहिला नियम शिकले !
कंकाली : सिरीमिरी
!
सपना आपा : (आश्चर्याने-)
या अमर ! तुझ्या घरचं कुणी गायचं का ?
कंकाली : जी,
माझे बाबूजी गायचे ! उस्ताद हदात अली खॉं साहेबांचे सर्वात पहिले
शागीर्द होते
ते !
सपना आपा : (धक्का
बसतो-) तरीच !
राधिका : काय
आपा ?
सपना आपा : खॉंसाहेबांच्या
पहिल्या महफिलचं नाव होतं, सिरीमिरी ! (तिच्या डोक्यावरून
हात फिरवत-)
मतलब पता है आपको, आपके नाम का ? (ती ‘नाही’ अशी मान
डोलावते-)
सावनमधे येणारी रिमझिम बारीश !!
राधिका : बहोत
खूब !
कंकाली : (डोळे
बंद करते. तिच्या डोळ्यातून पाणी ओघळतं-) आज पहिल्यांदा कुणीतरी
नावानं
बोलावतंय मला. नामच विसरून गेले होते मी स्वत:चं ! कंकाली...
कंकाली
म्हणून स्वत:ची ओळख सांगत होते, मिरवत होते !
सपना आपा : तुझ्या
घरच्यांना माहिती आहे, तू कंकाली गातेस ते ?
कंकाली : बाबूजी
एका सावकाराच्या घरात गाणं गायला गेले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी
पैसे
मागितले. सावकारानं बाबूजींना खूप मारलं. त्यात त्यांचा आवाज गेला.
मी जिथं
रहाते, तिथं खालच्या जातीतील लोकांना प्रश्न विचारायचा आणि
हक्काचे पैसे
मागायचा अधिकार नाही ! खालची जात आणि त्यात कलाकार !!
बाबूजींनी
अपमान सहन न होवून जीव दिला आणि मॉं त्या धक्क्यानं मरून
गेली.
(हसते-) खैर, छोडो...! जिंदगी है...अच्छी है !!
सपना आपा : खूप
बडी बात बोलून गेलीस सिरीमिरी...अगदी नावाप्रमाणे, नकळत
मनाच्या
जमिनीवर खूप मोठ्या तत्वद्न्यानाची रिमझिम बरसात केलीस तू !
(शून्यात
पहात-) जिंदगी है, अच्छी है !!
राधिका : कुठं
रहातेस ? कोण असतं तुझ्या सोबत ?
कंकाली : बाजूच्या
झोपडपट्टीत रहाते, एकटीच.
सपना आपा : आजपासून
इथंच येवून रहायचं, कायमचं !
कंकाली : जी,
नको ! कशाला माझा भार तुमच्यावर ?
सपना आपा : बाळा,
त्या वरच्याच्या कृपेनं पोट भरण्याइतपत मिळतंय मला ! तू कांही भार
नाहीस ! आणि
तसंही घराण्यात सामील व्हायचं असेल तर, तुला इथंच रहावं
लागेल ना !
कंकालीला आनंद
होतो. ती थरथरू लागते. तिला काय बोलायचं सुचत नाही. तिच्या डोळ्यातून पाणी येवू
लागतं. ती गडबडीनं उठते. कमरेला लावलेली थैली काढते आणि त्यातले सगळे पैसे,
नाणी-नोटा, आपाच्या पायावर टाकते आणि तिच्या पायावर डोकं टेकून रडू लागते. आपा
तिला उठवते. डोळे पुसते.
कंकाली : आपा,
तुम्हाला खात्री आहे, पुन्हा मी माझ्या आवाजात गावू शकेन ?
सपना आपा : अलबत
! कला शिकण्यासाठी नियत असावी लागते, स्वत:वर ऐतबार असावा
लागतो. आणि
तसंही तू खॉंसाहेबांच्या शागीर्दांची मुलगी आहेस...तू सूरातच
गाणार..खात्री
आहे माझी !
कंकाली : आपा,
मी तुमचं मानधन नाही देवू शकणार ! ही एवढीच काय ती कमाई आहे
माझी, एवढ्या
वर्षातली !
सपना आपा : हे
खूप दिलंयेस तू बाळा ! तुझी सगळी कमाई देवून जगातली सर्वात श्रीमंत
व्यक्ती
बनवलंयेस तू मला ! सिरीमिरी, सकाळची कंकाली ऐकवशील...? तुझ्या
आवाजात..सिरिमिरीच्या
आवाजातली...कंकालीच्या नव्हे !
कंकाली : आपा,
मी म्हणते पण, तुमचीच एक ‘चीज’ गावू ? तुमची हरकत नसेल तर...
आपा कौतुकानं
मान डोलावते. कंकाली खूष होते. आपाच्या पाया पडते. गॅलरीत जाते. तानपुर्याला
नमस्कार करून, मस्तकाला लावून बैठक घालून बसते. डोळे बंद करते. आपाही खुर्चीत
बसते. राधिका आपाच्या मांडीवर डोकं ठेवून बसते. तानपुरा वाजू लागतो. कंकाली आलाप
घेते. आपा आणि राधिका खूष होतात. एकमेकांकडे पहातात आणि पुन्हा तिच्या दिशेने
पहातात.
कंकाली : (आलाप)
कितीदा
नव्याने, पुराणे जगावे ?
कितीदा
पुराणे, नवे गीत गावे ?
कितीदा
जळावे, पुराण्या सुरांनी ?
कितीदा
उरावे, अपुर्या स्वरांनी ?
कितीदा
मनाचे, तराणे स्मरावे ?
कितीदा
पुराणे, नवे गीत गावे ?
हळू हळू सार्या
लाईट्स बंद होतात. एक प्रकाशझोत कंकालीवर पडतो. संध्याकाळची सोनेरी-लाल किरणं
तिच्या चेहर्यावर पडतात. तल्लीन होवून कंकाली गाणं गात आहे. सार्या आसमंतात तिचा
आवाज भरून राहिला आहे. गीत संपते. तानपुर्याचा आवाज वाढत जातो.
रंगमंचावर अंधार.
पडदा.