Pen


PEN 4 : १२ व्या वर्धापनदिनाच्या निमीत्ताने...


१० जून २०१७, एक सर्वसामान्य तारीख ! कुणालाच या दिवसाबद्दल अप्रूप वाटण्याचं कारण नाही. पण, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियांसाठी आणि मित्र-परिवारासाठी खूप महत्वाचा दिवस. साधारण १२ वर्षांपूर्वी (१० जून २००५) मी माझ्या (सॉरी...) आमच्या पहिल्या लघुपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली ! चित्रपट बनवतात कसा ? हे माहितही नसलेली ७ मुलं एकत्र येवून लघुपट तयार करण्याचं स्वप्नं पहात होती ! रणजीत, भैरू, संतोष, अमोल, नितीन, सागर आणि मी...ज्यांचा वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत कोल्हापूर, नाटक, चित्रपट निर्मीती कार्यशाळा वगैरे वगैरे गोष्टींशी दुरान्वयेही संबंध नव्हता...अशा गावात राहून...लग्नाचं चित्रीकरण करणार्‍या व्यावसायिक तरुणाला, स्थानिक कलाकारांना (त्यांचा अविश्वास पचवून) कन्विन्स करून चित्रीकरण करणं आणि तो लघुपट एका सिनेमागृहात दाखवणं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासारखं होतं आमच्यासाठी !

“शिकार” किंवा आमचा पहिला प्रयत्न काय होता आमच्यासाठी ? उत्तर आहे, खूप कांही !! आजवर आम्ही (आमच्या बॅनरखाली) ३० हून अधिक लघुपट, तितकेच माहितीपट केले पण जे समाधान “शिकार” नंतर मिळालं, ते परत कधीच मिळालं नाही. आजही आमची सर्वात आवडती शॉर्ट-फिल्म कोणती असेल तर, ती “शिकार” होय !

प्रवासात तुम्ही चालत रहाता...कित्येक लोक भेटतात...कांही सोबत चालतात तर, कांही थोडावेळ सहप्रवास करून आपापल्या रस्त्यावर मार्गस्थ होतात ! म्हणूनच आजवर मला मदत केलेल्या सर्व द्न्यात-अद्न्यात व्यक्तींचे आभार मानण्यासाठी हा खटाटोप ! आम्ही १२ वर्षात खूप मोठा तीर मारलाय असे नाही...स्वत:ला सिध्द करण्यासाठी चार-चौघांना करावा लागतो, तसाच स्ट्रगल आम्ही केला...करतोय पण हा प्रवास, स्ट्रगल अनेकांच्या प्रोत्साहनाशिवाय, आशीर्वाद-शुभेच्छा, मार्गदर्शन, साथ यांच्याशिवाय शक्यच नव्हता !

या प्रवासात...कांही गोड आठवणी आहेत, कांही कटू...कांही गडद...! आठवणींचं इंद्रधनु आहे म्हंटलं तर ते वावगं ठरू नये ! इथं प्रत्येकाच्या नावासह आभार मानणं खरच शक्य नाही...कारण मग ती यादी हजारात जाईल...

माझ्या आणि माझ्या मित्रांच्या प्रवासात सामील होवून आपण सर्वांनी आजवर आम्हांला घडवण्यात वाटा उचलला...पुढं चालत रहाण्याचं बळ दिलंत...तसंच आपलं हे प्रेम आमच्या सर्वांच्या पुढील वाटचालीसाठी मिळत राहो, हीच अपेक्षा !

आमच्या प्रवासाशी डिरेक्ट्ली आणि इनडिरेक्ट्ली जोडल्या गेलेल्या असंख्य पांथरांचे मन:पूर्वक आभार !

आणि माझे सर्व कलिग्ज, मित्र, पार्टनर्स यांना १२ व्या वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

 

आपला नम्र,

अनुप जत्राटकर आणि टीम

Pen Image

Pen Index